Marathi Sahitya Sammelan : कविकट्टा उपक्रमाला उर्त्स्फुत प्रतिसाद; पहिल्याच दिवशी २२० कविता 

नाशिक :  ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खास कवींसाठी कविकट्टा कार्यक्रम होणार असून यासाठी महाराष्ट्रातून कविता मागविण्यात येत आहे. कविकट्टा उपक्रमाला पहिल्याच दिवशी उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाला आहे. 

महाराष्ट्रभरातून २२० कविता

मराठी साहित्य संमेलनात कवीकट्टा उपक्रमातंर्गत कवी संमेलन संमेलनस्थळी कुसुमाग्रज हॉलमध्ये घेण्याचे नियोजन आहे. कवी संमेलन २३ तास चालणार असून यासाठी कवीकट्ट्याची बैठकही पार पडली आहे. कवी संमेलनासाठी महाराष्ट्रातून कविता मागविण्यात आल्या असून संयोजन समितीच्या आवाहनाला महाराष्ट्रातील कवींनी उर्त्स्फुत प्रतिसाद दिला असून पहिल्याच दिवशी मंगळवारी (ता.२) २२० कविता महाराष्ट्रातील कवींनी पाठविल्या आहेत.

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

इथे पाठवा तुमची कविता

कवीसंमेलनासाठी आठ समित्या गठित करण्यात आल्या आहे. त्यामाध्यमातून संयोजन समितीचे काम सुरू आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत कविता संयोजन समिती स्विकारण्यात येणार असून कवींनी मराठी साहित्य संमेलनाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या पत्त्यावर कविता पाठवाव्यात असे आवाहन कविकट्टा संयोजन समितीचे राजन लाखे, प्रसाद देशपांडे, शंकर बोर्हाडे, संतोष वाटपाडे यांनी केले आहे. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल