Marathi Sahitya Sammelan : कोरोनामुळे थंडावले संमेलनाचे कामकाज; विविध समित्यांची गटांमध्ये विभागणी 

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी गठित केलेल्या ३९ समित्यांची पुनर्रचना करण्यात आली असून, समित्यांमध्ये समन्वय असावा यासाठी आयोजकांनी ४० समित्यांची नऊ गटांत विभागणी केली आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संमेलनाचे कामकाज थंडावल्याचे चित्र आहे. 

मराठी साहित्य संमेलनाच्या चोख नियोजनासाठी आयोजकांनी विविध ३९ समित्यांची स्थापना केली होती. त्यात चित्र, शिल्पप्रदर्शन समितीची भर पडली. त्यानुसार ४० समित्यांचे कामकाज सुरू होते. आता गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत या ४० समित्यांची नऊ गटांमध्ये विभागणी करण्यात आली. यामुळे संमेलनाचे कामकाज अधिक गतीने व सुकर होईल, असा विश्‍वास आयोजकांना आहे; परंतु संमेलनाच्या नवीन तारखा जाहीर होईपर्यंत संमेलनाच्या कामकाजाला गती मिळाणार नसल्याची स्थिती आहे.

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

संमेलन स्थगित होईपर्यंत संमेलनाच्या कार्यालयात रोज होणाऱ्या बैठकांना सध्या ब्रेक लागला असून, आता फक्त आठवड्यातून एकदा समित्यांची बैठक होत असल्याचे दिसते. कार्यालयात कोणी फिरकत नसल्याने कार्यालयाची वेळ कमी करण्यात आली आहे. शहरात मिनी लॉकडाउनमुळे रविवारी कार्यालय बंदच ठेवण्यात येते. दरम्यान, संमेलनाचे कामकाज अधिक गतीने सुरू राहावे, यासाठी आयोजकांतर्फे समित्यांच्या रचनांमध्ये आणखी बदल केले जाण्याची शक्यता आहे.  

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी