Marathi Sahitya Sammelan : मराठी साहित्य संमेलनासाठी नोंदणी शुल्क गरजेचे ; निवास, अल्पोपहारासह भोजनाची व्यवस्था  

नाशिक : नाशिकमध्ये येत्या २६ ते २८ मार्चदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्य रसिकांची ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. संमेलनासाठी प्रतिनिधी शुल्क म्हणून तीन हजार रुपये आकारण्यात येणार असून, त्यात बाहेरून येणाऱ्या प्रतिनिधींची निवास, अल्पोपहार, भोजन आदी व्यवस्था संयोजन समितीतर्फे करण्यात येणार आहे. 

मराठी साहित्य संमेलनासाठी नोंदणी शुल्क तीन हजार रुपये 
कवी, लेखक, रसिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, उपाध्यक्ष महापौर सतीश कुलकर्णी, कार्याध्यक्ष हेमंत टकले, सह कार्याध्यक्ष ॲड. विलास लोणारी, मुकुंद कुलकर्णी, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, कार्यवाह प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, सुभाष पाटील, सहकार्यवाह किरण समेळ आदींनी केले आहे. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

नोंदणीसाठी... 
प्रतिनिधींनी आपली नोंदणी abmssnsk94nondani@gmail.com या ई-मेल आयडीवर करावी. तसेच, संमेलनाच्या खात्यावर तीन हजार रुपये नोंदणी शुल्क जमा करावे. त्यासाठी साहित्य संमेलनाच्या बँक खात्याचा तपशील असा : 
94 A B M S S LOKHITWADI MANDAL NASHIK 
0770100100000005 
The Nashik Merchants Co-op. Bank Ltd. 
College Road Branch 
IFSC : NMCB0000078  

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच