Marathi Sahitya Sammelan : व्हीआयपींना करावी लागणार पायपीट! संमेलनाच्या नियोजनातील गोंधळ

नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनातील गोंधळ आता एक-एक करून समोर येत आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे आयोजकांच्या तांत्रिक चुकीमुळे आता संमेलनासाठी येणाऱ्या व्हीआपींना पायपीट करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

व्हीआयपींना करावी लागणार पायपीट 
संमेलनस्थळ म्हणून महामंडळाकडून गोखले एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणास मान्यता देण्यात आली होती. मात्र, आयोजक लोकहितवादी मंडळाला नियोजन करताना ही जागा कमी वाटत असल्याने संमेलन सभागृह हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हे करत असताना व्हीआयपी कक्षाचे स्थलांतर करण्याचा विसर पडल्याने पायपीटीची शक्यता निर्माण झाली आहे. संमेलनाची जागा निश्‍चित झाल्यानंतर आयडिया महाविद्यालयाकडून आराखडाही तयार करण्यात आला होता. मात्र, त्यात मुख्य सभागृहात बदल केल्यामुळे पुन्हा नव्याने आराखडा तयार करावा लागणार आहे. त्यासाठी आयोजक कामाला लागले असून, बैठकांचे सत्रही सुरू आहे.

हेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर

संमेलन सभागृह हलवले; पण व्हीआयपी कक्षाचा विसर 

पूर्वनियोजनानुसार संमेलन सभागृह अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर व मागच्या बाजूला व्हीआयपी कक्ष स्थापन करण्याची योजना होती. आता मुख्य सभागृह क्रिकेट मैदानावर होत आहे. मात्र, व्हीआयपी कक्षात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. व्हीआपी कक्षापासून हे मैदान लांब असल्याने आयोजकांसह स्वयंसेवकांचे व्हीआयपींच्या नियोजनातच श्रम वाया जाणार असल्याचे दिसत आहे. 

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार

प्रवेशद्वारही बदलावे लागणार 
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात चार प्रवेशद्वार आहेत. त्यातील एचपीटी-आरवायके महाविद्यालयाचे प्रवेशद्वार आयोजकांनी व्हीआयपींसाठी राखीव ठेवले आहे. तर फार्मसी, बीवायके महाविद्यालयाचे प्रवेशद्वार सर्वसामान्यांसाठी होते. आता मुख्य सभागृहच बदलण्यात आल्याने सभागृहाच्या जवळ असलेले फार्मसी महाविद्यालयाचे मैदान व्हीआयपींसाठी करावे लागण्याची शक्यता आहे.