Marathi Sahitya Sammelan : संमेलन आयोजकांना कोरोनाचा धसका! मास्क वापरणे बंधनकारक 

नाशिक : राज्यासह नाशिकमध्ये वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येसह प्रशासनाने जाहीर केलेल्या कोरोना नियमावलीमुळे संमेलनाच्या आयोजकांनी धसका घेतला असून, संमेलनाच्या कार्यालयात ‘नो मास्क- नो एन्ट्री’चा सूचना फलक लावण्यात आला आहे. 

संमेलनाच्या आयोजकांचा धसका

मराठी साहित्य महामंडळाने कोरोना रुग्णसंख्या घटत असल्यामुळे नाशिकमध्ये संमेलन होणार असल्याची घोषणा केली होती. संमेलनाचे यजनमानपद असलेल्या लोकहितवादी मंडळाने कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी होईल, असा अंदाज घेत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जागेची निश्‍चिती केली होती. मात्र कोरोना परिस्थिती निवळली असल्याचे दिसत होते. तसेच लसीकरणही सुरू झाल्यामुळे अभियांत्रिकी मैदान सोशल डिस्टस्निंगच्या नियम, संमेलनाला येणारी गर्दी बघता अपुरे पडणार असल्याचे आयोजकांना लक्षात येताच त्यांनी गोएसोच्या क्रिकेट मैदानात संमेलन होणार असल्याचे सांगितले. कोरोनामुळे यंदाच्या साहित्य संमेलनाच्या उपस्थितीवर काही निर्बंध राहणार असून, सोशल डिस्टस्निंगचे पालन करत एक आसनाची जागा सोडत बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.

हेही वाचा - अखेर 'त्या' तरुणीच्या मृ्त्यूचे गूढ उकलले; पोलिसांकडून २४ तासात संशयितांना बेड्या 

मास्क वापरणे बंधनकारक

स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी संमेलनात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्यावी, अशा सूचना केल्या असून, त्या दिशेने पावलेही उचलली जात आहेत. मात्र कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून, संमेलनाचे नियोजन करताना आधीपासूनच आयोजक कोरोना पार्श्वभूमीवर सर्व नियमावली पाळत नियोजन करत होते, आता नियमावलीत प्रशासनाने बदल केल्यामुळे आयोजकांसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे संमेलनस्थळी येणाऱ्या प्रत्येकाला आयोजकांनी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे.  

हेही वाचा - इगतपुरीच्या ३०० फूट खोल दरीत तब्बल ११ तासांचा थरार! अखेर रेस्क्यू टिमच्या प्रयत्नांना यश