Marathi Sahitya Sammelan : संमेलन समित्या निवडीवरून साहित्यिकांमध्ये खदखद; राजकीय मंडळी असल्याची चर्चा

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ३९ समित्यांच्या प्रमुखांसह उपप्रमुखांच्या समित्यांचे मुख्य समन्वयक विश्‍वास ठाकूर यांनी नुकतीच घोषणा केली. या समित्यांमध्ये निवड झालेल्या समित्यांवरील व्यक्तींवर नाशिकमधील साहित्यिकांची खदखद समोर आली आहे.

समित्यांमध्ये अनेक राजकीय मंडळी असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. या समित्यांचे काम सुरू होण्याअगोदरच साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केल्याने रविवारी (ता. १४) नाशिकमधील सर्व साहित्यिकांची सहविचार सभा घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

नाशिकमधील साहित्यिकांमध्ये नाराजी

बैठकीत साहित्यिकांच्या अपेक्षा, अनुभव जाणून घेण्यात येणार असल्या तरी काम सुरू होण्याआधीच नाराजी व्यक्त होत असल्याने आयोजकांसमोर नवीन प्रश्‍न उभा आहे. समित्यांमध्ये स्थान न मिळाल्यामुळे स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठीही तयार आहोत, पण एखादी जबाबदारी मिळाली असती तर जोमाने काम करता आले असते, अशी भावना नाशिकमधील साहित्यिकांमध्ये आहे. सभेत संमेलनाबाबत नाशिकमधील साहित्यिकांच्या असलेल्या अपेक्षा काय असतील, याकडेही सर्वांचे लक्ष लागले असून, या सहविचार सभेतून नाराज झालेल्या साहित्यिकांची मनधरणी होते का हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बैठकीत जिल्ह्यातील सर्व लेखक, कवी, नाटककार उपस्थित राहणार आहेत. या सहविचार सभेतून संमेलन संयोजन समितीला आलेल्या विविध सूचना पुढील काळात राबविण्यात येणार असल्याचे सांगितले जात असले तरी याआधी नाशिककर कवींकडून घेण्यात आलेल्या मेळाव्यातील किती सूचनांचा आणि त्यानंतर झालेल्या विविध बैठकीतील आलेल्या सूचनांचा किती विचार झाला हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नाशिकमधील नाराज साहित्यिकांची रविवारी होणाऱ्या सहविचार बैठकीआधी प्रखरतेने आपली बाजू मांडण्यासाठी चर्चा होणार आहे. 

हेही वाचा - लग्नाच्या दोनच दिवसांत नवरी पसार! पुण्यातील नवरदेवाची लाखोंची फसवणूक

सहविचार सभा रविवारी 

मराठी साहित्य संमेलनासाठी समित्यांची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व साहित्यिकांची सहविचार सभा रविवारी (ता. १४) दुपारी तीनला साहित्य संमेलनाच्या कार्यालयात होणार आहे. बैठकीला जिल्ह्यातील साहित्यिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, कार्याध्यक्ष हेमंत टकले, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील साहित्यिकांच्या ग्रंथांचे प्रदर्शन 

साहित्य संमेलनात जिल्ह्यातील साहित्यिकांच्या ग्रंथांचे प्रदर्शन होणार असून, बैठकीसाठी येताना ज्या साहित्यिकांची ग्रंथसंपदा प्रसिद्ध आहे त्यांनी आपल्या पुस्तकाच्या दोन प्रती सोबत घेऊन याव्यात, असे आवाहन संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे. 

हेही वाचा - ऑनलाइन गेम ठरतायत विद्यार्थ्यांच्या भविष्याला घातक! मानसिक गुंता सोडविण्यासाठी तज्ज्ञांकडे गर्दी 