Measles : आता गोवरसाठी क्वारंटाईन! नाशिकमध्ये ‘इतके’ विलगीकरण कक्ष

गोवर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गोवर (Measles) प्रतिबंध आणि निर्मूलन करण्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या टास्क फोर्सने विलगीकरण कक्ष उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील एक जिल्हा शासकीय रुग्णालय, सहा उपजिल्हा रुग्णालये आणि २१ ग्रामीण रुग्णालये अशा एकूण २८ ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी दिली आहे.

राज्यात गोवरवर (Measles) नियंत्रण मिळवण्यासाठी विलगीकरण व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना गोवर प्रतिबंध आणि नियंत्रण टास्क फोर्सने दिले होते. दरम्यान, राज्यात गोवरचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. संशयित गोवर रुग्णांची संख्या 10 हजार 544 वर पोहोचली आहे. तर गोवरची लागण झालेल्यांची संख्या 658 वर पोहोचली आहे. तुलनेेने नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात गोवरचा एकही रुग्ण नाही. तसेच दोन दिवसांपूर्वी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांच्या अहवालात एक रुग्ण पॉझिटिव्ह होता, मात्र योग्य उपचार पद्धतीनंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करून या बालकांना आवश्यक पोषण आणि जीवनसत्त्व ‘अ’ चा डोस द्यावा, असे निर्देश टास्क फोर्सने प्रशासनाला दिल्याची माहिती डॉ. नेहेते यांनी दिली आहे.

हेही वाचा :

The post Measles : आता गोवरसाठी क्वारंटाईन! नाशिकमध्ये 'इतके' विलगीकरण कक्ष appeared first on पुढारी.