MNS : मनसेच्या बांधणीसाठी राज ठाकरे यांचा पुणे तर अमित ठाकरे यांचा नाशिक दौरा

<p>मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे आता पक्षबांधणीच्या कामाला लागलेत. राज ठाकरे &nbsp;आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत, तर अमित ठाकरे आजपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे पुण्यात विभाग प्रमुखांच्या थेट मुलाखती घेऊन अगामी महापालिका निवडणुकींबाबत चर्चा करणार आहेत. तर नाशिकची जबाबदारी अमित ठाकरे यांच्याकडे दिली जाणार असल्यानं त्यांनी नाशिककडे लक्ष द्यायला सुरुवात केलीय. त्यादृष्टीनं त्यांचा तीन दिवसांचा नाशिक दौरा महत्वाचा ठरणार आहे.</p>