Site icon

Mouni Amavasya : कालसर्प दोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी मौनी अमावस्येला करा हे खास उपाय

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

21 जानेवारीला मौनी अमावस्या (Mouni Amavasya) आहे. वर्षातली ही एकमेव अमावस्या आहे, ज्या दिवशी मौन पाळलं जातं. म्हणून या अमावस्येचं नाव मौनी अमावस्या आहे.

पितरांच्या मोक्ष प्राप्तीसाठी या अमावस्येला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे. मौनी अमावस्याला पितरांचे स्मरण पुजन केले जाते. या अमावस्येला काही उपाययोजना केल्यास पितृदोष व कालसर्प दोष दूर होतात. पितरांचे शुभआशीर्वाद मिळतात. त्यामुळे या दिवशी श्राद्ध, तर्पण विधी नक्की करायला हवेत असे ज्योतिष अभ्यासक सांगतात.

Mouni Amavasya : या दिवशी काय करावे ?

या दिवशी मौन धारण करुन तीर्थक्षेत्री अथवा आपल्या परिसरातील पवित्र ठिकाणी स्नान करावे.

सकाळी लवकर उठून स्नान करुन गायत्री मंत्राचे उच्चारण करुन सूर्याला अर्घ्य द्यावे.

पितरांच्या मोक्षप्राप्ती हेतू विधीयुक्त तर्पन, श्राद्ध करावे.

गरजू व गरिब लोकांना या दिवशी अन्नदान व वस्त्रदान करावे.

असे केल्याने कुळातील पितरांना मोक्ष प्राप्त होतो. पितृदोष दूर होतो. पितरांचे शुभआर्शीर्वाद मिळतात. ज्यांना तर्पन श्राद्ध शक्य नसेल त्यांनी स्वधा स्रोताचा पाठ करावा असे केल्याने श्राद्ध केल्याचे फळ मिळते. अशी माहिती नाशिकच्या ज्योतिष प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिली.

ज्यांच्या कुंडलीत कालसर्प दोष व पितृदोष आहेत त्यांनी वरील विधी आवर्जून करायला हवे. असे केल्याने कुंडलीतीत कालसर्पदोष व पितृदोष दोन्ही दूर होतात. त्याचे अशुभ परिणाम कमी होण्यास मदत होते.

 -प्राजक्ता कुलकर्णी, ज्योतिष(नाशिक)

 

हेही वाचा : 

The post Mouni Amavasya : कालसर्प दोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी मौनी अमावस्येला करा हे खास उपाय appeared first on पुढारी.

Exit mobile version