MPSC Final Result 2019 : मुलींमध्ये प्रथम आलेली नाशिकची मानसी पाटील ‘माझा’वर : Nashik

<p>MPSC Final Result 2019 : यूपीएससी पाठोपाठ राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 (एमपीएससी) चा अंतिम निकाल &nbsp;जाहीर केला आहे. साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम अव्वल आला आहे. तर मानसी पाटील मुलींमध्ये प्रथम आली आहे. &nbsp;मागील अनेक दिवसांपासून हे उमेदवार एमपीएससीकडे निकाल लावण्याची मागणी करत होते अखेर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे.&nbsp;</p> <p>राज्य सेवा आयोगाने एकूण 420 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. &nbsp;या परीक्षेच्या माध्यमातून उप जिल्हाधिकारी , तहसीलदार, &nbsp;नायब तहसीलदार, &nbsp;पोलीस उपअधिक्षक अशी वेगवेगळी 26 प्रकारची पदे भरली जाणार आहेत. &nbsp;राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.</p>