Mumbai Sanjay Punumia : माजी पोलीस आयुक्त Parambir Singh यांच्या निकटवर्तीयांविरोधात गुन्हा दाखल

<p>मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निलंबनाच्या कारवाईला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. खंडणी, वसुलीच्या आरोपाखाली परमबीर सिंह यांची चौकशी होणार आहे. पण त्या चौकशीआधीच मागील काही महिन्यांपासून परमबीर सिंह गायब आहेत. त्यामुळे हे आरोप आणि त्यातील त्यांच्या भूमिकेविषयी गृहविभागानं पोलीस महासंचालक कार्यालयाकडे सविस्तर माहिती मागवली आहे.</p> <p>याआधीच पोलीस महासंचालक कार्यालयानं परमबीर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवला होता. त्यात सर्व माहिती नसल्यानं गृहखात्यानं सुधारित अहवाल मागितल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळतेय. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.</p>