Murder : कंडारी गावात पूर्व वैमानस्यातून दोन सख्ख्या भावांचा खून

पुढारी वृत्तसेवा :

भुसावळ शहराला लागून असलेल्या कंडारी गावात पूर्व वैमानस्यातून दोन सख्ख्या भावांचा खून रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास गावातील मुख्य रस्त्यावर झाला.

कंडारी गावातील मुख्य रस्ता असलेल्या आयडियल मेन्स पार्लर या दुकानात समोरील चौकात रात्री साडेदहा वाजेनंतर शांताराम साळुंखे व राकेश साळुंखे या दोन्ही सख्या भावांचा खून झाल्याची घटना घडली. तर विकी सपकाळे व  इगले हे दोघे जखमी झालेले असून यांना पुढील उपचारासाठी गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या व्यावसायिक वादातून हा खून झाला असावा. आरोपींची नाव निष्पन्न झालेले असून पोलीस पुढील तपास करित आहे., घटनास्थळी प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पडघम बाजारपेठ चे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड दोघी पोलीस स्टेशनचे कर्मचारी एक घटनास्थळावर दाखल झालेले आहे आरोपींचा शोध घेण्याचे कामही सुरू झालेले असून त्यासाठी पथक रवान झालेले आहे.

हेही वाचा :

The post Murder : कंडारी गावात पूर्व वैमानस्यातून दोन सख्ख्या भावांचा खून appeared first on पुढारी.