Murder : गुप्तांगावर वार करुन तरुणाचा खून, चोपड्यातील घटनेनं खळबळ

मृत्यू,

जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच आता चोपडा तालुक्यात तरुणाच्या गुप्तांगावर वार करुन खून केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसांत खुनाचा (Murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील अकुलखेडा नजीक असलेल्या संकेत हॉटेल समोरील पाटाचे चारीजवळ तरुणाचा मृतदेह आढळून आला. अज्ञात इसमाने तरुणांच्या गुप्त अंगावर मारून खून केल्याचे दिसून येत आहे. दिनेश वेरसिंग पावरा (वय ३० रा. अकुलखेडा, ता. चोपडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादनुसार चोपडा शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून तपास सुरु…
फिर्यादीत नमूद करण्यात आले की, कोणी तरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी अज्ञात कारणावरुन फिर्यादी दिलीप वेरसिंग सस्ते (पावरा) याचा भाऊ दिनेश वेरसिंग सस्ते (पावरा) यास अकुलखेडा गांवाजवळ संकेत हॉटेल समोर असलेल्या पाटाचे चारीजवळ गुप्तांगावर वार करुन खून (Murder) केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण हे करित आहे.

हेही वाचा :

The post Murder : गुप्तांगावर वार करुन तरुणाचा खून, चोपड्यातील घटनेनं खळबळ appeared first on पुढारी.