Site icon

Murder : दहा हजारांसाठी मित्रानेच काढला काटा, सौरभ चौधरी खून प्रकरणाचा उलगडा

जळगाव : शहरातील सौरभ यशवंत चौधरी (वय ३१, रा.दशरथ नगर, जळगाव) या तरुणाच्या खून प्रकरणी मयताचा मित्र ईश्वर नथ्थू सपकाळे (वय २५, रा.कानळदा) यास कानळदा शिवारातून अटक करण्यात आली. उधारीचे १० हजार रुपये परत न केल्याच्या कारणातून हा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा उघडकीस आला.

सोमवार, ३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भादली ते शेळगाव दरम्यान पुलानजीकच्या पाटचारीत रस्त्याने जाणार्‍या लोकांना तरुणाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता क्रुरपणे सौरभचा गळा चिरलेला तर कपाळावर घाव घालण्यात आल्याचे दिसून आले होते. यानंतर एलसीबीने तपासचक्र गतिमान करीत अवघ्या तीन दिवसात गुन्हा उघडकीस आणला.

पुणे : प्रलोभाची मैत्री पडली 57 लाखांना; परदेशातून महागडे गिफ्ट अन् दोन कोटी पाठविण्याचे आमिष

अवघ्या १० हजाराच्या वादातून झाला खून
मयत सौरभ आणि ईश्वर हे दोघं मित्र होते. दोघे जण बर्‍याचदा सोबत दारू प्यायचे आणि गांजा देखील ओढायचे. मागील दीड दोन वर्षापूर्वी सौरभने ईश्वरकडे १० हजार उधार मागितले होते परंतू ईश्वरकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने आपल्या एका परीचयातील माणसाकडून दुसर्‍या एका व्यक्तीच्या मध्यस्थीने पैसे उधार घेऊन दिले होते. परंतू अनेक दिवस होऊन देखील सौरभ पैसे परत करत नव्हता आणि दुसरीकडे ईश्वरला पैसे देणारे तगादा लावत होते.

सौरभने ईश्वरलाच मारण्याची दिली होती धमकी…
सौरभ आणि ईश्वर भादली शिवारातील भादली-कानसवाडा रस्त्यावरील पाटचारीवर पोहचले. याठिकाणी दोघांनी गांजा ओढला. यावेळी ईश्वरने पुन्हा एकदा पैशांचा विषय काढला. त्यावर सौरभने पैसे देणार नाही आणि तू जास्त मागे लागला तर तुला उडवून टाकेल अशी पुन्हा धमकी दिली. ईश्वरला वाटलं खरचं सौरभ आपल्याला मारून टाकेल की काय?. त्याने क्षणाचाही विलंब न करता दुचाकीवर शेतात कामासाठी नेलेल्या पिशवीतून रॉड काढून सौरभच्या डोक्यात टाकला. तीन वेळेस डोक्यात रॉड टाकल्यानंतर विळ्याने सौरभवर अंधाधुंद वार करायला सुरुवात केली. तिथून घरी जातांना ईश्वरने असोद्याजवळील त्याच पान टपरीलगत पाण्याच्या हाळवर हाथपाय धुतले आणि घरी जाऊन कपडे बदले. तसेच दुसर्‍या दिवसापासून घरातून पसार झाला.

पुणे : फुलांचे तोरण अन् रांगोळीच्या पायघड्या; घराघरांत पारंपरिक वातावरणात साजरा झाला दसरा

या पथकाने केला खुनाचा उलगडा…
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, उपनिरीक्षक अमोल देवळे, सहायक फौजदार रवी नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेढे, जितेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, महेश महाजन, अक्रम शेख, संदीप साळवे, रणजीत जाधव, विनोद पाटील, किशोर राठोड, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, ईश्वर पाटील, रमेश जाधव यांनी या खुनाचा उलगडा केला.

हेही वाचा :

The post Murder : दहा हजारांसाठी मित्रानेच काढला काटा, सौरभ चौधरी खून प्रकरणाचा उलगडा appeared first on पुढारी.

Exit mobile version