
त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
नातवाने केलेल्या मारहाणीत वयोवृद्ध आजीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.23) हरसूल (ता. त्र्यंबकेश्वर) येथे घडली. या प्रकरणी हरसूल पोलिस ठाण्यात खुनाचा खुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगूबाई रामा गुरव (70) असे मृत आजीबाईचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिस उपनिरीक्षक जनार्दन झिरवाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार गंगूबाई गुरव (रा. इंदिरानगर, हरसूल) या काही वर्षांपासून अर्धांगवायूमुळे बिछान्याला खिळून होत्या. त्यांची देखभाल करत असताना नातू दशरथ नेहमी त्यांना रागावत असे. मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास दशरथ याने रागाच्या भरात आजीला मारहाण केली. त्यांच्या हातातील कडे आजीला लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत हरसूल पोलिस ठाण्यात संशयित दशरथ विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जनार्दन झिरवाळ, एस. सी. जाधव, पी. एम. जाधव तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- जळगावात पुन्हा खून ; चाकूने भोसकून युवकाची हत्या
- Girija Oak : अभिनेत्री गिरिजा ओकचा साडी लूक…पहा फोटो
- चक्क रेडियमसारख्या चमकणार्या डोळ्यांचे मासे
The post murder : नातवानेच केला आजीचा खून; नाशिकच्या हरसूल येथील घटना appeared first on पुढारी.