Murder : सप्तशृंगी गडावरील सुरक्षारक्षकाचा खून, गडावर खळबळ

सप्तशृंगीगड खून, www.pudhari.news
सप्तशृंगगड : पुढारी वृत्तसेवा 
सप्तशृंगगडावर सुरक्षारक्षकाचा खून (Murder) झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. गडावरील गणेश घाटाच्या धबधब्यापुढे रात्री 9 वाजेच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या युवकाचा खून झाला असून सप्तशृंग गडावर देवी संस्थान मध्ये सुरक्षारक्षक या पदावर तो कार्यरत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदुरी ते सप्तशृंग गड या दहा किलोमीटरच्या अंतरात गणेश घाटाच्या धबधब्याजवळ एक युवक जखमी असल्याचे गडावर दर्शनासाठी येणाऱ्या काही भाविकांनी पाहिले. त्यांनी सप्तशृंगगडावरील न्यासाच्या कार्यालयास ही माहीती दिली. घटनास्थळावर न्यास प्रशासनाने रुग्णवाहिका पाठविली व वरीष्ठ अधिकारी व पोलिसांना या घटनेची माहीती देण्यात आली.
पोलीसांनी घटनास्थळावर येऊन तपास केला असता मृतदेहाची ओळख पटली असून अर्जुन पवार (30) रा. सप्तशृंगगड असे या युवकाचे नाव आहे. हा युवक सप्तशृंग गडावर देवी संस्थान मध्ये सुरक्षारक्षक या पदावर कार्यरत होता अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली.  याप्रकरणी कळवण पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  दरम्यान या घटनेमुळे सप्तशृंगगडावर खळबळ उडाली असून अधिक तपास कळवण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक समाधान नागरे करीत आहेत.

हेही वाचा :

The post Murder : सप्तशृंगी गडावरील सुरक्षारक्षकाचा खून, गडावर खळबळ appeared first on पुढारी.