Nandurbar : रेशन दुकानदाराकडून लाच घेताना गोडाऊन कीपरला रंगेहात पकडले

लाचप्रकरण

नंदुरबार : रेशन दुकानाचा परवाना रद्द न होणे व रेशन दुकान ब्लॅक लिस्टमध्ये न टाकणे याकरिता जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या नावे व स्वतःसाठी लाचेची मागणी करणाऱ्या गोडाऊन कीपरला रंगेहाथ पकडण्यात आले. नंदुरबारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

याप्रकरणी नंदुरबार तहसील कार्यालयातील गोडाऊन कीपर दिनेश शामराव रणदिवे (४४) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अनरद, ता. शहादा, जि. नंदुरबार येथील तक्रारदार यांचे संत मीराबाई महिला बचत गट या नावाने रेशन दुकान असून या रेशन दुकानाचा परवाना रद्द न होणे व रेशन दुकान ब्लॅक लिस्टमध्ये न टाकणे याकरिता डी. एस. ओ. / जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या नावे व स्वतःसाठी लाचेची मागणी केली म्हणून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

कॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस उपअधीक्षक राकेश आ. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबारचे समाधान वाघ, माधवी वाघ, विलास पाटील, विजय ठाकरे, अमोल मराठे, देवराम गावित, मनोज अहिरे, ज्योती पाटील, जितेंद्र महाले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा :

The post Nandurbar : रेशन दुकानदाराकडून लाच घेताना गोडाऊन कीपरला रंगेहात पकडले appeared first on पुढारी.