Nandurbar Bridge : धानोरा रस्त्यावरील ब्रिटिशकालीन पूल कोसळला

नंदुरबार पुल कोसळला,www.pudhari.news

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार तालुक्यातील धानोरा रस्त्यावरील ब्रिटिशकालीन जुना पूल (Nandurbar Bridge) दुरावस्थेमुळे अचानक कोसळल्याची घटना आज (दि. 29) रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.

तथापि महाराष्ट्र-गुजरात हद्दीला जोडणारा महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे गुजरातकडे जाणारी वाहतूक प्रभावित झाली आहे. तसेच नंदुरबार तालुक्याला जोडलेल्या शेकडो गावांचा संपर्क खंडित झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 50-100 वर्ष जुने पूल दुरावस्थेत असतानाही दुरुस्तीचे ठोस प्रयत्न होत नसल्याचा मुद्दा यामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आज कोसळलेली रंका नदीवरील पूल (Nandurbar Bridge) नंदुरबार- सुरत महामार्गाला जोडणारा दुवा होता. प्राप्त माहितीनुसार नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथे सुमारे शंभर वर्षांपूर्वी इंग्रज काळात हा पुल तयार करण्यात आला होता. या पुलाची मुदत पूर्ण झालेली होती. परिणामी सर्व बाजूंनी खचला होता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. नवापूर रस्त्यापेक्षा हा रस्ता सोयीच्या असल्यामुळे अवजड वाहने याच रस्त्याने याच पुलावरून जात होते. दरम्यान, घटनेच्या काही मिनीटापूर्वीच काही अवजड वाहने येथून गेली होती.

हेही वाचा :

The post Nandurbar Bridge : धानोरा रस्त्यावरील ब्रिटिशकालीन पूल कोसळला appeared first on पुढारी.