Narendra Giri Death:महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूचं गूढ कायम,Nashikच्या साधू-महंतांमध्ये अस्वस्था

<p><strong>Narendra Giri Death :</strong>&nbsp;आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी (Narendra Giri) यांचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत सापडला होता. महंत नरेंद्र गिरी यांच्या अल्लापूर या येथील बाघंबरी या ठिकाणच्या निवासस्थानी हा मृतदेह सापडला असून पंख्याला लटकून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. त्या ठिकाणी सापडलेल्या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी (Anand Giri) याला अटक केली आहे. महंत नरेंद्र गिरी यांची आत्महत्या की हत्या हा वाद सुरु असताना आखाडा परिषदेतील संपत्तीचा वाद समोर आल्याने या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.&nbsp;</p> <p>महंत नरेंद्र गिरी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये शिष्य आनंद गिरी हा आपल्याला त्रास देत असल्याचं सांगितलं आहे. तसेच या नोटमध्ये आपला वारस कोण असावा, मठ आणि आश्रममध्ये भविष्यात कशा प्रकारचे काम करण्यात यावं, कशा प्रकारची व्यवस्था असावी या सगळ्याची माहिती दिली आहे. महंत नरेंद्र गिरी यांची सुसाईड नोट ही एक प्रकारचे मृत्यूपत्रच असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.&nbsp;</p> <p>&nbsp;</p>