Nashik : अकराशे दिव्यांनी उजळला लासलगावच्या भगरीबाबा मंदिराचा परिसर

अकराशे दिवे,wwwpudhari.news

नाशिक, लासलगाव : पुढारी वृत्तसेवा

दीपावली म्हणजे लख्ख लख्य दिव्यांचा दीपोत्सव. लखलखत्या दिव्यांनी सर्वांच्याच जीवनाला प्रकाशमय करणारी, प्रकाशाने परिसर आणि जीवन उजळून टाकणारी, फटाक्यांच्या आतीषबाजीने आनंदाला उधाण आणणारी दीपावली म्हणजे संपूर्ण वर्षातील एक मोठा आनंदोत्सव. दिवाळीनिमित्ताने येथील भगरीबाबा मंदिरात अकराशे दिवे प्रज्वलीत करण्यात आले. 

वसुबारसच्या शुभ मुहूर्तावर पहिला दिवा ग्रामदैवताला या भावनेने सालाबाद प्रमाणेच यंदाही दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानने, प. पू. भगरीबाबा मंडळाने तसेच लहान मुलामुलींपासून जेष्ठांपर्यंत सर्वांनी यात उत्साहाने सहभाग घेतला.

यावेळी राजा शिवछ्त्रपती प्रतिष्ठानचे तसेच प.पू. भगरी बाबा भक्त मंडळाचे संजय बिरार, हसमुखभाई पटेल, ऋषीकेश जोशी, राजेंद्र जाधव, विकास आहेर, पंकज होळकर, निलेश देसाई, उमेश पारिक, प्रीतम पवार, गणेश कुलकर्णी, श्रीकांत भावसार, श्रीराम जामदार, लक्ष्मीकांत जामदार, महेश गोसावी, अशोक महाराज, भावेश शिरसाठ, अक्षय वडनेरे, शैलजा भावसार, दिपा उपाध्ये, श्रावणी देसाई, दामिनी महाले, डाॅ. वैष्णवी भावसार, आराध्या जोशी आणि परिसरातील प.पू. भगरीबाबा भक्त मंडळाचे सदस्य उपस्थित  होते. 

हेही वाचा :

The post Nashik : अकराशे दिव्यांनी उजळला लासलगावच्या भगरीबाबा मंदिराचा परिसर appeared first on पुढारी.