Nashik : अजित पवारांची दिंडोरीला गुपचूप भेट

अजित पवार,www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे पूर्वनियोजित दिंडोरी तालुक्यात खासगी दौऱ्यावर असून, त्यांनी दोन मद्य प्रकल्पाला भेट दिली आहे. अत्यंत गोपनीयता पाळत अजित पवार यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांनाही या दौऱ्यापासून दूर ठेवण्यात आले.

सकाळी आठ वाजता नाशिक विमानतळवर अजित पवार यांचे आगमन होत त्यांनी दिंडोरी तालुक्यातील कादवा-म्हाळुंगी येथील परनार्ड रिकार्ड या मद्य बनवणाऱ्या कंपनीला भेट देत तेथील डिस्टिलरीची पाहणी केली, तर दहाच्या सुमारास परमोरी येथील डियाजिओ (मॅक्डोवेल) कंपनीला भेट देत मद्य प्रकल्पाची पाहणी केली. या दौऱ्यात कोणत्याही राजकीय व्यक्तीचा सहभाग नव्हता. कंपन्यांतील कामगारांनाही या भेटीची माहिती नव्हती. दरम्यान, अजित पवार दिंडोरी तालुक्यात आल्याचे समजताच माध्यम प्रतिनिधींनी मॅक्डॉवेल्स कंपनीच्या गेटवर येत अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

मात्र, कुणालाही आत सोडण्यात आले नाही. तर अजित पवार यांनाही ही बाब समजताच त्यांनी पत्रकारांचा ससेमिरा टाळत कंपनीच्या मागील गेटने बाहेर पडत नाशिक गाठले. अजित पवार यांच्या गोपनीय दौऱ्याची मोठी चर्चा परिसरात रंगली होती.

हेही वाचा :

The post Nashik : अजित पवारांची दिंडोरीला गुपचूप भेट appeared first on पुढारी.