Nashik : अजित पवार यांच्या विरोधात लासलगावी भाजपाचे आंदोलन

लासलगाव,www.pudhari.news

नाशिक (लासलगाव) पुढारी वृत्तसेवा

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरुन राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. लासलगाव येथही भाजपा मंडलच्या वतीने अजित पवार पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.

अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजे धर्मवीर नव्हते ते स्वराज्यरक्षक होते असे विधान केले होते. अजित पवार यांच्या या वक्तव्या विरोधात भाजपच्या वतीने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने आणि निषेध नोंदविला जात आहे.  भाजपा लासलगाव मंडल च्या वतीने लासलगाव येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, माफी मागा माफी मागा, होश में आओ होश में आओ, अजित पवार यांचा निषेध असो…अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा अजित पवार यांनी द्यावा अशी मागणीच थेट भारतीय जनता पक्ष नाशिक जिल्हा ग्रामीण, महिला मोर्चा, युवा मोर्चा, लासलगाव मंडलाच्या वतीने करण्यात आली.

भाजपच्या नाशिक जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुवर्णा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडल उपाध्यक्ष रवी होळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जेष्ठ नेते दत्तूलाल शर्मा, मंडल महिला अध्यक्षा स्मिता कुलकर्णी, जैन प्रकोष्ट अध्यक्ष मनीष चोपडा, संतोष पवार, विशाल पालवे, दीपक कुलकर्णी, सुनील नेवगे, सचिन नेवगे, महेश जेऊघाले, अनिल नवले, अतुल देसाई, मयूर वाघचौरे, संतोष केंदळे, दादा आरोटे, शिवा जोंधळे, जीवन पांगुळ, मयूर सोनवणे, सिंधू पल्हार, भारती महाले, निर्मला साळवे, मंजाबाई देवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post Nashik : अजित पवार यांच्या विरोधात लासलगावी भाजपाचे आंदोलन appeared first on पुढारी.