Nashik : अन् लाखो भाविकांनी गजबजलेली त्र्यंबकेश्वरनगरी शांत झाली…

संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव,www.pudhari.news

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

संत निवृत्तिनाथ संजवीन समाधी दर्शनाच्या ओढीने आलेले वारकरी गुरुवारी सकाळी काल्याचे कीर्तन आटोपताच मिळेल त्या साधनाने परतीच्या प्रवासाला लागले. त्यामुळे सोमवार ते बुधवार लाखो भाविकांनी गजबजलेली त्र्यंबकेश्वरनगरी शांत झाली आहे.

गत आठवडाभरा त्र्यंबकेश्वरनगरी भाविकांच्या गर्दीने दुमदुमून गेली होती. मात्र, आता भाविक भरतीच्या मार्गाला लागल्याने शहरात शांतता दिसत आहे. दरम्यान, भाविकांचा पूर ओरसल्यानंतर शहरात रस्तोरस्ती कचरा पडला आहे. तो स्वच्छ करण्याचे आव्हान नगरपालिका प्रशासनासमोर आहे. मुख्याधिकारी संजय जाधव यांनी प्रशासक म्हणून केलेले नियोजन सर्व कर्मचाऱ्यांच्या सन्मवयातून सुरळीतपणे झाले.

भाविक भरतीच्या मार्गाला लागल्याने शहरात शांतता दिसत आहे

पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम यशस्वी

नगर परिषदेकडून यात्रा कालावधी शहरात पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम बसवली होती. त्याचे नियंत्रण कक्ष नगरपालिका कार्यालयात होते. जवळपास दोन हजारांच्या आसपास हरवलेल्या, चुकलेल्या व्यक्तींना त्याचा लाभ मिळाला. मुख्याधिकारी संजय जाधव यांनी पालिका कार्यालयात आलेले मात्र त्यांना घेण्यास कोणीही आले नाही अशा जवळपास 100 व्यक्तींना चादर, ब्लँकेट देऊन त्यांची मुक्कामाची व्यवस्था केली. तसेच त्यांना दुसऱ्या दिवशी घरच्या व्यक्तींपर्यंत पोहचविले. 

हेही वाचा :

The post Nashik : अन् लाखो भाविकांनी गजबजलेली त्र्यंबकेश्वरनगरी शांत झाली... appeared first on पुढारी.