Nashik : अपघातग्रस्त प्रवाशाला सोडून रिक्षाचालक झाला फरार

नाशिक : रिक्षाचा अपघात झाल्यानंतर वृद्ध प्रवाशास मदत करण्याऐवजी रिक्षाचालक फरार झाल्याची घटना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडली. सुनील छबूराव मगरे (६५, रा. गंगापूर रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (दि. १८) रात्री 9.45च्या सुमारास ते एमएच १५ ईएफ १२३८ क्रमांकाच्या रिक्षाने घरी जात होते.

रिक्षाचालकाने भरधाव रिक्षा चालवण्याने मगरे यांनी त्यास रिक्षा हळू चालविण्यास सांगितले. मात्र रिक्षाचालकाने त्याकडे दुर्लक्ष केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर तेथील गतिरोधकावर रिक्षा उलटली. या अपघातात मगरे यांना गंभीर दुखापत झाली. तरीदेखील रिक्षाचालकाने मगरे यांना जखमी अवस्थेत तेथेच सोडून पळ काढला. या प्रकरणी रिक्षाचालकाविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा :

The post Nashik : अपघातग्रस्त प्रवाशाला सोडून रिक्षाचालक झाला फरार appeared first on पुढारी.