Nashik : अवकाळी पावसामुळे कांद्याचं नुकसान, शेतकऱ्यांनं पिकांवर फिरवला रोटर ABP MAJHA

<p>अवकाळी पाऊस आणि त्यातच पडणारं धुकं यामुळे कांदा पिकावर रोगांचा प्रादूर्भाव वाढलाय. त्यामुळे नाशिकच्या बल्हेगाव इथले शेतकरी भाऊसाहेब सोमासे यांनी आपल्या एक एकर कांद्याच्या शेतात रोटर फिरवून पीक नष्ट केलं. कांदा हा नाशिक जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांचं नगदी पीक आहे. पण गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसानं कांदा पिकाचं सर्वाधिक नुकसान झालंय. महागड्या दरानं कांदा रोप विकत घेऊन एकरी साठ हजारांचा खर्च शेतकऱ्यांनी केला. पण रोगांमुळे पीक खराब झाल्यान त्यावर रोटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली.</p>