Nashik : उड्डाणपूल उद्घाटनाला तुफान गर्दी ; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला शिवसेना नेत्यांकडून हरताळ

<p>ठाकरे सरकारच्या गर्दी न करण्याच्या सुचनाना शिवसेनेच्या नेत्यांकडूनच हरताळ फासला जात आहे.&nbsp; नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंच्या हस्ते होणाऱ्या उड्डाणपुलाच्या उदघाटन कार्यक्रमाला स्थानिक नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांची तूफान गर्दी केली होती. गोडसेंसह अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हते. तर काल युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या युवासेना संवाद कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. या कार्यक्रमातही सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला होता. त्यामुळं नियम मोडणाऱ्या सर्वसामान्यांवर &nbsp;ज्याप्रमाणे कारवाई होते, त्याप्रमाणे नेतेमंडळीवर कारवाई होणार का ? असा प्रश्न या निमित्याने विचारला जावू लागलाय.</p>