Nashik : ‘एकात्मते’साठी धावले लासलगावकर

लासलगाव,www.pudhari.news

नाशिक,  लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
पोलिस स्मृतिदिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उपविभागीय पोलिस अधिकारी निफाड व लासलगाव पोलिस ठाण्याच्या वतीने एकता दौडचे आयोजन शहरात करण्यात आले होते. लासलगाव रेल्वेस्थानकापासून दौडला सुरुवात झाली, तर समारोप पोलिस ठाणे येथे करण्यात आला.

राष्ट्रीय एकता दिवस अनुषंगाने राष्ट्राची एकता अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी तसेच देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी स्वतःला समर्पित करून हा संदेश देशवासीयांमध्ये पोहोचण्यासाठी या एकता दौडचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली. या दौडमध्ये सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या समवेत पोलिस अंमलदार तसेच अनेक तरुणांनी सहभाग घेतला होता.

हेही वाचा :

The post Nashik : ‘एकात्मते’साठी धावले लासलगावकर appeared first on पुढारी.