Nashik : एक्स सेक्टर’मध्ये उद्या गोळीबाराची प्रात्याक्षिके, चुकूनही जाऊ नका…

गोळीबार प्रात्यक्षिके,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देवळाली कॅम्प येथील तोफखाना मुख्यालयातील आर्टिलरी स्कूलतर्फे नाशिक व इगतपुरी तालुक्यातील एक्स सेक्टर याठिकाणी गुुरुवारी (दि. 6) सकाळी 6 ते सायंकाळी 4 या कालावधीत गोळीबाराची प्रात्यक्षिके केली जाणार आहेत. त्या अनुषंगाने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात नागरिकांनी प्रवेश करू नये, असे आवाहन अपर जिल्हा दंडाधिकारी भागवत डोईफोडे यांनी केले.

नाशिक तालुक्यातील वंजारवाडी व इगतपुरी तालुक्यातील टाकेद खुर्द, अधरवड, बेळगाव तर्‍हाळे, सोनांशी, आडसर खुर्द, वारशिंगवणे, तळवाडी, सामनेरे, घोटी खुर्द, लहान घोटीची वाडी, नांदूरवैद्य, टाकेद बुद्रुक, धामनगाव, नांदगाव बुद्रुक, साकूर दुमाला, बेळगाव कुर्‍हे, मालुंजे, गंभीरवाडी, भरवीर खुर्द, लहवित, अस्वली व कवडदरा ही एक्स सेक्टरमधील गावे धोक्याच्या पातळीत येत आहेत. त्यामुळे गोळीबार प्रात्यक्षिकाच्या दिवशी व त्यावेळी धोक्याच्या हद्दीत प्रवेश करणे अथवा आपली जनावरे ठेवणे हा मॅन्युव्हर्स फिल्ड फायरिंग अँड ऑर्टिलरी प्रॅक्टिसेस कायद्यांतर्गत गुन्हा आहे.

प्रतिबंधित करण्यात आलेल्या क्षेत्रात प्रवेश केल्यास प्राण धोक्यात येऊन हानी झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहणार नाही. सदर सूचनेचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही डोईफोडे यांनी कळविले आहे.

हेही वाचा :

The post Nashik : एक्स सेक्टर'मध्ये उद्या गोळीबाराची प्रात्याक्षिके, चुकूनही जाऊ नका... appeared first on पुढारी.