NAshik : ऐन दिवाळीत नाशिक जिल्ह्यातील 1200 गावं अंधारात, महावितरणनं केला पथ दिव्यांचा पुरवठा खंडित

<p>ऐन दिवाळीच्या तोंडावर नाशिक जिल्ह्यातील गावं अंधारात आहेत, ग्राम पंचायतीने महावितरणचे वीजबिल थकविल्यानं पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याने गावच्या गावं अंधारात आहेत. दिवाबत्तीच्या मूलभुत सुविधेपासून हजारो ग्रामस्थांनी वंचित राहावे लागत आहे. लाखो रुपये खर्च करून लावण्यात आलेले हायमास्ट, पथदिव्यांचे पोल शोभेच्या वस्तू झालेत, सायंकाळी सात नंतरच गावात काळाकुट्ट अंधार असल्याने सर्वच गावात भीतीदायक वातावरण पसरलंय, याच अंधारात महिला फेरफटका मारतात, लहान मुलं रस्त्यावर- गावाच्या चौकात खेळतात तर इतर ग्रामस्थ &nbsp;मोबाईलच्या प्रकाशात वाट तुडवीत जातात.नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढलाय, झाडा झुडपात उसाच्या शेतात दबा धरून बसलेला बिबट्या कधी झडप मारेल याचा नेम नाही.&nbsp;</p>