Nashik : कळवण तालुक्यात भात लावणीची लगबग

कळवण तालुक्यात भात लागवड सुरु,www.pudhari.news

कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या पंधरादिवसांपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. उशिरा आलेल्या पावसामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी बांधावांना आहे. मात्र आहे त्या पाण्याचा वापर करून पारंपरिक लोक गीते गात भात लागवडीची लगबग सुरु केली आहे.

कळवण हा आदिवासी बहुल व डोंगराळ भाग असल्याने या परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. तालुक्यातील पश्चिम भागातील दळवट, जिरवाडा, जामले, कुमासाडी, वीरशेत, शिंगाशी, ततानी, मांगलीदर, बापखेडा, धनोली भांडणेसह  परिसरात खरीप हंगामातील प्रमुख शेती म्हणून भात, नाचणी, वरई, सोयाबीन, मका आदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. चालू वर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्याने या परिसरात त्याचा फटका सर्वच पिकांना बसला आहे.

ज्या शेतकऱ्यांनी विहिरीतील सिंचनाच्या पाण्याद्वारे भात पिकाचे बियाणे पेरले होते. त्यांची रोपे सध्या लावणी योग्य झाले आहेत. रोपे लावणीस तयार झाले असल्याने अशा शेतकऱ्यांची सध्या शेतात भाताची लागवडीसाठी लगबग सुरु झाली आहे. लागवडीवेळी या आदिवासी महिला पारंपरिक लोकगीत गात अवनी लागवड करीत आहेत. रस्त्याने जाणाऱ्या चाकरमाच्या कानावर या गीतांचा आवाज पडत असल्याने अनेक पर्यटक, प्रवासी रस्त्यावर थांबून आपल्या भ्रमणध्वनी मध्ये व्हिडीओ तयार करून स्टेटसला ठेवत आहेत.

हेही वाचा :

The post Nashik : कळवण तालुक्यात भात लावणीची लगबग appeared first on पुढारी.