
कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी धनंजय पवार तर उपसभापतीपदी दत्तु गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. लोकनेते कै. ए. टि पवार कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच झाली होती. आज निवडणूक निर्णय अधिकारी चिंतामण भोये यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली.
यावेळी विहीत मुदतीत सभापतीपदासाठी धनंजय पवार व उपसभापतीपदासाठी दत्तु गायकवाड यांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषीत करण्यात आली. यावेळी जाहिर मेळाव्यात आमदार नितीन पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक यशवंत गवळी, बाळासाहेब गांगुर्डे, सुधाकर खैरणार, दिलीप कुवर, दत्तू गायकवाड, प्रविण देशमुख, पंढरीनाथ बागुल, सोमनाथ पवार, सुनिता जाधव, रेखा गायकवाड, बाळासाहेव वराडे, योगेश शिंदे, शशिकांत पवार हे उपस्थित होते.
बाजार समितीत गेल्या दहा वर्षात अनेक विकास कामे झाली आहेत. उर्वरित कामे येत्या पाच वर्षात शेतकरी, व्यापारी, संचालक मंडळ यांना विश्वासात घेऊन मार्गी लावली जातील.
-धनंजय पवार, नवनिर्वाचित सभापती
निवडणूक पार पडली आहे. आता जिल्ह्यातील बाजार समितींप्रमाणे लोकनेते ए. टि. पवार यांच्या नावाला साजेशे काम संचालक मंडळाने एकत्र येऊन करावे. व्यापारी बांधवांनी खरेदी वाढवावी. आपल्या भागातील शेतकरी बांधवांना इतर बाजार समिती प्रमाणे शेतमालाला भाव द्यावा.
– नितिन पवार, आमदार
हेही वाचा :
- कामगारांच्या मुलांची शासनाकडून थट्टा ! महिन्याला केवळ 167 रुपये शिष्यवृत्ती
- ठेकेदार-अधिकाऱ्यांचे नालेसफाईत ‘हात ओले’! भाजपने केले नाले सफाईचे पितळ उघडे
The post Nashik : कळवण बाजार समिती सभापतीपदी पवार तर उपसभापतीपदी गायकवाड appeared first on पुढारी.