
इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात आज बुधवार (दि. 1) पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास चालत्या ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. एम. एच. 03 सी. पी. 6171 हा ट्रक नाशिकहुन मुंबईच्या दिशेने जात असतांना ही आग लागली. आग लागलेल्या ट्रकला दोन वेळा विझवण्याचा प्रयत्न करूनही पुन्हा हा ट्रक पेटला. या आगीत ट्रक पुर्णपणे जळून भस्मसात झाला आहे.
प्रसंगावधान राखत ट्रक चालकाने ट्रकला बाजूला लावून पलायन केल्याने त्याचा जीव वाचला. महामार्ग पोलीस केंद्र घोटी, टोल प्लाझाचे अग्निशमन दल कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर केले. मात्र बाहेरून आग आटोक्यात आणली गेली तरी या ट्रकने पुन्हा आतून आग पकडल्याने एकच धावपळ झाली. या घटनेमुळे मुंबई आग्रा महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाल्याने कसारा घाटात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
घोटी टोल प्लाझाचा अग्निशमनचा बंब व इगतपुरी नगरपरिषदेचा अग्निशमनचा बंब तसेच टोलप्लाझाचे कर्मचारी, महामार्ग सुरक्षा पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. घटनेनंतर ट्रक बाजुला करून वाहतुक सुरळीत करण्यात आली.
हेही वाचा :
- नगर : ..तर जाहीर माफी मागायला तयार ! : अॅड. प्रताप ढाकणे
- Ind vs Aus 3rd Test : ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का
- Maharashtra Political Crisis : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची मोठी टिप्पणी म्हणाले,
The post Nashik : कसारा घाटात बर्निंग ट्रकचा थरार appeared first on पुढारी.