
नाशिक : कारचे टायर पंक्चर झाल्याने ते काढत असताना चोरट्याने संधी साधून कारमधील पैशांची बॅग चोरून नेल्याची घटना शिंगाडा तलाव परिसरात घडली. देवीसिंग जीवाराम पुरोहित (२३, रा. आनंदवली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते सोमवारी (दि.१९) रात्री ९.३० च्या सुमारास एमएच १५, एचएम १४५३ क्रमांकाच्या कारमधून घरी जात होते. शिंगाडा तलाव परिसरात आल्यानंतर त्यांच्या कारचे टायर पंक्चर झाल्याने त्यांनी कारमधील स्टेपनी काढून टायर बदलले.
त्यादरम्यान, कारच्या पाठीमागील सीटवर ठेवलेली सात लाख ७० हजार ४०० रुपयांची बॅग व ॲपल मोबाइलचे ॲडाप्टर चोरट्याने कारचा दरवाजा उघडून चोरून नेले. या प्रकरणी पुरोहित यांच्या फिर्यादीनुसार, मुंबई नाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- मास्कचा वापर करा : आरोग्यमंत्र्यांबरोबरील बैठकीनंतर नीती आयोगाचे सदस्य डॉ. पॉल यांची सूचना
- बेळगाव : मंत्र्यांकडून काँग्रेस आमदाराला अपमानास्पद वागणूक ; विधानसभा तहकूब
The post Nashik : कारचे टायर पंक्चर होताच चोरट्याने साधली संधी, 7 लाख केले लंपास appeared first on पुढारी.