Site icon

Nashik : कार्तिक एकादशीनिमित्त फुलली त्र्यंबकनगरी

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

रविवारी कार्तिक वद्य एकादशीस राज्यातील वारकरी भाविकांच्या गर्दीने त्र्यंबकनगरी फुलून गेली. संत निवृत्तिनाथ मंदिर परिसरात नाथांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

सकाळपासूनच भाविकांचा ओघ सुरू झाला होता. संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिर परिसरात जत्रा भरली होती. त्याला प्रचंड गर्दी उसळली होती. त्याच सोबत कुशावर्तदेखील दिवसभर भाविकांनी गजबजलेले होते. कुशावर्त तिर्थाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या श्रीकृष्ण मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत त्र्यंबकनगरी गजबजलेली पाहावयास मिळाली.

समाधी मंदिर सभामंडप काळ्या पाषाणात ?
संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. आता परिसर विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार काम सुरू आहे. मात्र, नेमके काय काम सुरू आहे? याबाबत माहिती देणारा फलक लावलेला नाही. त्यातही सभामंडपाचे काम काळ्या पाषाणात करावयाचे, अशी मागणी वारकरी भक्तांची आहे. मात्र, शासनाने मंजूर केलेल्या निधीत ते शक्य होणार नाही. त्यासाठी विश्वस्त मंडळाने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही.

हेही वाचा :

The post Nashik : कार्तिक एकादशीनिमित्त फुलली त्र्यंबकनगरी appeared first on पुढारी.

Exit mobile version