Nashik: ‘किमान ग्रामिण भागातील शाळा सुरु करा’- प्राथमिक शिक्षण संघ ABP Majha

<p>कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमी राज्य सरकारनं राज्यातील सर्व शाळा येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारच्या निर्णयाला अनेक स्तरातून विरोध होताना दिसतोय. शिक्षण तज्ज्ञांसह विद्यार्थी आणि पालकदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणच्या शाळा सुरू मागणी करू लागलीय. याचपार्श्वभूमीवर अॅक्टिव्ह टीचर्स फोरमचे राज्य संयोजक व शिक्षण तज्ज्ञ भाऊसाहेब चासकर यांनीही राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आवाज उठवलाय. नंदुरबार, गडचिरोली भागात जर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असता तर सरकारनं&nbsp;<a title="पुणे" href="https://marathi.abplive.com/news/pune" data-type="interlinkingkeywords">पुणे</a>, मुंबईच्या शाळा बंद केल्या असत्या का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय.</p>