Nashik : कीर्तनातून शिवरायांच्या कार्याचा जागर : छत्रपती संभाजीराजे

छत्रपती संभाजी राजे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देव, देश, धर्म वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केले, तेच कार्य कीर्तनरूपी कार्यक्रमातून पार पाडले जात आहे. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून सामान्यांवरील अन्याय, अत्याचार व ढोंगी राजकारणाविरोधात जी चळवळ सुरू केली, त्यामध्ये वारकरी आणि समाज प्रबोधनकारांची साथ मिळत आहे, असे प्रतिपादन माजी खासदार तथा स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले.

सातपूर, श्रमिकनगर येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी व संत सावता महाराज मंदिर वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य श्रीमद् भागवतकथा व अखंड हरिनाम सप्ताहात ते बोलत होते. पुढे संभाजीराजे म्हणाले की, ‘चांगल्या कामांसाठी कोणी दबाव टाकत असेल तर मतदानातून त्याला धडा शिकवला पाहिजे. यावेळी त्यांनी मुंबई येथे उपोषणाला बसलेलो असताना वारकरी संप्रदायाने जी ताकद दिली, त्यामुळे भूक-तहान मला जाणवलीच नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी संघटनेचे प्रवक्ते करण गायकर, धनंजय जाधव, आप्पासाहेब कुढेकर, माजी नगरसेवक सदाशिव माळी, हेमलता कांडेकर, दिनकर कांडेकर, सविता गायकर, प्रमोद जाधव, सुवर्णा मंडळ, गोविंद माळी, नवनाथ शिंदे, विष्णुपंत घुगे, वाळूबा थोरात, एकनाथ माळी, दिलीप महाले उपस्थित होते. सप्ताह सोपान महाराज रावळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचा :

The post Nashik : कीर्तनातून शिवरायांच्या कार्याचा जागर : छत्रपती संभाजीराजे appeared first on पुढारी.