Nashik: कुसुमाग्रजनगरीत साहित्यिकांचा कुंभमेळा, आजपासून तीन दिवस सारस्वतांचा मेळावा ABP Majha

<p>कुसुमाग्रजनगरीत आजपासून साहित्यिकांचा मेळा भरतोय. पण यंदाचं ९४ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संमेलनाध्य़क्षांच्या प्रत्यक्ष हजेरीविनाच होणार. कारण नियोजित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर प्रकृतीच्या कारणास्तव नाशकातील संमेलनाला जाणार नाहीत. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचं सावट पाहता आणि नारळीकरांची प्रकृती पाहता संमेलनाला न जाण्याचा निर्णय नारळीकर कुटुंबियांनी घेतलाय. त्यामुळे डॉ. जयंत नारळीकर साहित्य संमेलनाला ऑनलाईन हजेरी लावणार असल्याचं कळतंय.</p>