Nashik : गणिताऐवजी चक्क जीवशास्त्राचे गुण; हायकोर्टाने बारावी शिक्षण बोर्डाला फटकारलं ABP Majha

<p>विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळणाऱ्या महाविद्यालय आणि बारावी शिक्षण बोर्डाला उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक लगावलीय.. नाशिकमधील स्नेहल देशमुख या विद्यार्थिनीने बारावी बोर्डाची परीक्षा ८२ टक्क्यांनी पास केली.. मात्र गुणपत्रीकेत तिला गणिताऐवजी जीवशास्त्राचे गुण दाखवण्यात आले.. पालकांनी ही चूक महाविद्यालय आणि शिक्षण बोर्डाच्या निदर्शनास आणून दिली.. यावेळी दोन्ही कडून टोलवा टोलवी सुरू झाल्याने देशमुख कुटुंबियांना मनस्तापला समोर जाव लागलं.. याप्रकरणी पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.. न्यायालयाने ७ दिवसात निकाल दुरुस्त करून देण्याचे आदेश देत पालकांना झालेल्या मनस्तापचा मोबदला म्हणून २५ हजार रुपये देण्याचे आदेश दिलेत..</p> <p>&nbsp;</p>