
नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
मनमाड रेल्वे स्थानकावर जनशताब्दी एक्सप्रेस सुरु होताच मोठा अपघात होता होता टळला आहे. जालना रेल्वेस्थानकातून निघालेली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस (क्र. १२०७२ ) मुंबईकडे जात असताना मनमाड रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 5 वर पोहचली, तेथून गाडी सुरु होताच गाडीच्या डब्याची कपलिंग तुटल्याने अर्धी गाडी पुढे निघून गेल्याची घटना घडली. वेळीच हा प्रकार लक्षात आल्यानंतर गाडी थांबाविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
कपलिंग तुटलेला डबा काढून त्याच्या जागी दुसरा डबा जोडण्यात आल्यानंतर गाडी मुंबईकडे रवाना करण्यात आली. या घटनेमुळे दोन तास गाडीचा खोळंबा झाला होता. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. गाडी धावत असताना जर कपलिंग तुटली असती तर मोठी दुर्घटना झाली असती. सुदैवाने रेल्वे स्थानकावर कपलिंग तुटल्यामुळे पुढील अनर्थ टळून प्रवाशांचा जीव वाचला.
- गडचिरोली : व्हीप झुगारल्याप्रकरणी कुरखेडा नगर पंचायतीच्या भाजप नगरसेविकेचे सदस्यत्व रद्द
- राज्यातील तीन साहित्यिकांना युवा साहित्य पुरस्कार प्रदान
The post Nashik : गाडी सुरु होताच तुटली कपलिंग, मनमाड स्थानकावर मोठा अपघात होता होता टळला appeared first on पुढारी.