Nashik : गायीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 10 ते 15 रुपयांची वाढ, नाशिककरांना कोजागिरी ‘महागात’ पडणार

<p>आज कोजागिरी पोर्णिमा.. आजच्या दिवशी दुधाला विशेष महत्व असते. दूध आटवत देवीला आज नैवेद्य दाखवला जाऊन त्यानंतर हे दूध प्राशन केले जाते. दूध व्यावसायिकांची मोठी उलाढाल आज होत असून नाशिकसह अनेक ठिकाणी दुधाचे दर गगनाला भिडले आहेत. म्हशीच्या भावात आज तब्बल 14 ते 20 रुपयांनी तर गाईच्या दुधात लिटरमागे 10 रुपयांची वाढ झाली आहे. म्हशीच्या दूधाची आज कुठे 80 तर कुठे शंभर रुपयांनी विक्री होत असल्याच बघायला मिळत असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने ही परिस्थिती उदभवल्याच व्यावसायिक सांगतायत. दूध खरेदीसाठी अगदी पहाटेपासूनच रांगा लागल्याच चित्र नाशिकमध्ये बघायला मिळत असून आधीच महागाईची झळ सोसणाऱ्या नागरिकांना आता दूधही वाढीव किमतीने खरेदी करावं लागतं असल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जातेय.&nbsp;</p>