
देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
शेती करणे परवडत नाही, त्यामुळे गावच विकण्याचा निर्णय घेतलेल्या देवळा तालुक्यातील माळवाडी गावाला शुक्रवारी (दि. १०) माजी खासदार युवराज संभाजीराजे भोसले यांनी भेट देत निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांची भेट घेऊन समस्या जाणून घेऊन, मी तुमच्या भावना समजू शकतो. मी तुमच्या बरोबर आहे. कांद्याला भाव मिळत नाही, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे, याची सरकारने दखल घ्यावी, असेही आवाहन केले.
या भेटीप्रसंगी शेतकऱ्यांच्या व्यथा व अडचणींचे पत्र आणि तुकडे बंदी कायदा रद्दबाबत निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने अविनाश बागूल, अमोल बागूल यांनी संभाजीराजे यांना दिले. यावेळी शिवनिश्चल फाउंडेशनचे अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी त्यांचे स्वागत केले. सरपंच शिवाजी बागूल, हिरामण शेवाळे, ग्रामविकास अधिकारी संभाजी देवरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव तसेच देवळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष पंडितराव निकम यांनी देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत केले.
हेही वाचा :
- नागपूर : गोरेवाड्यात आफ्रिकन सफारीची घोषणा; चित्ता, जिराफ दिसणार
- पुणे : जिल्ह्यातील 2047 सरकारी वाहने होणार स्क्रॅप
- नेतान्याहू यांना इशारा
The post Nashik : गाव विकण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा : युवराज संभाजीराजे भोसले appeared first on पुढारी.