Nashik : गिरणारेत 14 लाखांचा गुटखा जप्त

गुटखा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अन्न औषध प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी कारवाई करीत रविवार (दि.24) गिरणारे येथे साडेचौदा लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी भूषण प्रताप वानखेडे (28, रा. तारवालानगर) या संशयितास ताब्यात घेतले.

रविवार गंगापूर रोड जवळील जी. पी. फार्मजवळून एमएच 15 एफव्ही 2546 क्रमांकाचे वाहन जाणार असून त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटख्याचा साठा असल्याची खबर अन्न औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार अन्न औषध प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाने या परिसरात सापळा रचला. वाहनाच्या तपासणीत पान मसाल्याची 6 हजार 600 पाकिटे सापडली. त्याची किंमत 13 लाख 6 हजार इतकी आहे. तसेच सुंगधित तंबाखूची सहा हजार 600 पाकिटेही सापडली. तंबाखूची किंमत एक लाख 45 हजार दोनशे इतकी आहे. पथकाने एकूण 14 लाख 52 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

त्याचबरोबर पाच लाख रुपये किमतीचे पिकअप वाहनही पथकाने जप्त केले आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न औषध प्रशासनाचे सहआयुक्त गणेश परळीकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) विवेक पाटील, अमित रासकर, अविनाश दाभाडे, अन्नसुरक्षा अधिकारी के. री. पाळे यांनी केली.

हेही वाचा :

The post Nashik : गिरणारेत 14 लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.