Nashik : घोरवड घाटात धावत्या ट्रकला आग

धावत्या ट्रकला आग,www.pudhari.news

नाशिक, सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर-घोटी मार्गावर घोरवड घाटात आज सकाळी सात वाजेच्या सुमारास धावत्या ट्रकला अचानक आग लागली. आगीत ट्रक जळून खाक झाला.

या ट्रक मध्ये प्लास्टिक भरलेले असल्याचे समजते. त्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. सिन्नर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला पाचरण करण्यात आले. पथकाने शर्तीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. लाला वाल्मिकी, नवनाथ जोंधळे, आकाश देवकर, लक्ष्मण सोनकुसरे, जयेश बोरसे आदींचा पथकात समावेश आहे.

एमआयडीसी अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा ट्रक (क्र.- एमएच 48 बीएम 1676) घोटीहून सिन्नरच्या दिशेने जात होता.

हेही वाचा :

The post Nashik : घोरवड घाटात धावत्या ट्रकला आग appeared first on पुढारी.