Nashik : चांदवडच्या जवानाचे उपचारादरम्यान निधन

चांदवड जवानाचे निधन,www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

भारतीय लष्करात तैनात असलेले चांदवडचे भूमिपुत्र सूरज उल्हास चौबे (३३) यांचे हरियाणातील अंबाला येथे उपचार सुरू असताना निधन झाले. आजारपणामुळे निधन झाल्याचे चौबे कुटुंबीयांनी सांगितले. या घटनेचे वृत्त समजताच सगळीकडे शोककळा पसरली आहे.

लहानपणापासूनच सूरजला सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. शालेय शिक्षण घेत असतानाच मेहनत घेत त्याची लष्करात भरती झाली. सध्या तो लायसन नाईक पदावर हरियाणा राज्यात तैनात होता. तेथे तो आजारी पडल्याने त्यावर उपचार सुरू असताना बुधवारी (दि.११) सकाळी निधन झाले. या बातमीचे वृत्त समजताच चांदवड तालुक्यात शोककळा पसरली. गुरुवारी (दि.१२) सकाळी चांदवडला शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील व दोन बहिणी असा परिवार आहे.

हेही वाचा :

The post Nashik : चांदवडच्या जवानाचे उपचारादरम्यान निधन appeared first on पुढारी.