
इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
चालत्या ट्रकमधून बकऱ्या फेकत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ट्रक मागून येणाऱ्या एका कारमधील प्रवाशांनी हा व्हिडीओ शुट केल्याचे दिसते.
या व्हिडिओमधून एका चालत्या ट्रकमधून बकऱ्या फेकण्याचा निर्दयी प्रकार समोर आला. हा व्हिडिओ आधी उत्तर प्रदेशमध्ये असल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु उत्तर प्रदेशातील उन्नाव पोलिसांनी हा व्हिडिओ महाराष्ट्रातील इगतपुरी तालुक्यातील असल्याचं ट्वीट केलं. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील खंबाळे फाटा येथील मुंबई आग्रा महामार्ग परिसरातीलच हा व्हिडिओ असल्याचे निष्पन्न झाल्याचे बोलले जात आहे.
या व्हिडिओत एक युवक एका चालत्या ट्रकमधून रस्त्यावर बकऱ्या फेकत असल्याचे दिसते. बकऱ्या फेकून झाल्यानंतर तो त्या ट्रकमधून खाली उतरतानाही दिसतो आहे. मात्र हा व्हीडिओ नक्की किती दिवसांपूर्वीचा आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. त्यासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न सुरु असून घोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला असल्याने या संदर्भात अजून पर्यंत कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झाली नसल्याचे घोटी पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा :
- sharad pawar news | अजित पवारांचे ‘ते’ पाऊल चुकीचे, ‘लोक माझे सांगाती’मध्ये शरद पवारांची स्पष्टोक्ती
- सोनालीच्या ब्लॅक मॅजिकची चाहत्यांवर मोहिनी…
- Morgan Stanley layoff | आर्थिक मंदीचा बँकिंग क्षेत्राला मोठा फटका, ‘मॉर्गन स्टॅनली’कडून ३ हजार कर्मचाऱ्यांना नारळ
The post Nashik : चालत्या ट्रकमधून बकऱ्या फेकतानाचा व्हिडीओ व्हायरल appeared first on पुढारी.