Nashik :जितेंद्र आव्हाडांकडून मंदिरात आरती,गुन्हा कार्यकर्त्यांवर;राज्यात मंत्र्यांसाठी वेगळा कायदा?

<p>महाराष्ट्रात मंत्र्यांसाठी वेगळा आणि सामान्य जनतेसाठी वेगळा कायदा आहे का? हा प्रश्न विचारण्यामागचं कारण म्हणजे नाशिक पोलिसांनी मंत्र्यांना अभय देत फक्त कार्यकर्त्यांवर केलेली कारवाई.. कोरोनामुळं राज्यभरातील मंदिरं बंद आहेत. मात्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी नियम मोडून नाशिकच्या श्री नवश्या गणपतीची आरती केली.<br />या प्रकरणी नाशिक पोलिसांनी आरतीवेळी उपस्थित असलेल्या जितेंद्र आव्हाडांच्या 5 कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे. मात्र आव्हाडांविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. पोलिसांनी गुन्हा नोंदवताना असा दुजाभाव का केला असा प्रश्न आता विचारला जातोय.</p>