
नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
ञ्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहाचा दरवाजा चांदीचा करण्यात आला असून, औरंगाबाद येथील भाविक देसरडा परिवाराने हा दरवाजा देवस्थान ट्रस्टला देणगी म्हणून दिला आहे. लाकडी दरवाजा व त्यावर चांदीचा नक्षीदार पत्रा असा हा संपूर्ण दरवाजा 21 लक्ष रुपयांचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
देसरडा परिवाराने यापूर्वी त्र्यंबकराजाच्या पूजेसाठीची चांदीची भांडी, पिंडीवर पूजेनंतर ठेवण्यात येणारे चांदीचे मुखवटे दिले आहेत. विश्वस्त प्रशांत गायधनी यांच्या मागर्दशनाने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचे चांदीचे भांडी, मुखवटे आदी देणगी देण्यात आलेल्या आहेत. दरवाजा लोकार्पणाप्रसंगी चेअरमन न्यायधीश विकास कुलकर्णी, विश्वस्त प्रशांत गायधनी, तृप्ती धारणे, संतोष कदम, भूषण अडसरे, सत्यप्रिय शुक्ल, दिलीप तुंगार यांच्यासह देसरडा कुटुंबीय उपस्थित होते.
हेही वाचा :
- Smita Patil Love story : विवाहित राज बब्बरच्या प्रेमात पडल्या होत्या स्मिता पाटील
- Insomnia : अनिद्रेमुळे वाढतो काचबिंदूचा धोका
- Robbery : कंटाळा आला म्हणून टाकला दरोडा; आरोपीची धक्कादायक कबुली
The post Nashik : त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहासाठी भाविकाकडून चांदीचा दरवाजा appeared first on पुढारी.