Site icon

Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिर आठ दिवस राहणार बंद

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा 

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. मात्र नववर्षाच्या प्रारंभीच मंदिर आठ दिवस बंद असणार आहे.

येथील ज्योतिर्लिंगाची झीज होत असून ती रोखण्यासाठी वज्रलेप तसेच मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी गुरुवार दि. ५ ते  दि. १२ जानेवारी या कालावधीत मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत भाविकांना मंदिरात प्रवेश बंद करण्यात येणार असून दर्शन घेता येणार नाही. त्याचबरोबर येथील गर्भगृहाला भाविकांनी भेट दिलेला चांदीचा दरवाजाही बसविला जाणार आहे.

मंदिरातील गर्भ गृह पिंडीची, पाळची होत असलेली झीज थांबविणे व महादेवाच्या पिंडीचे संवर्धन व्हावे यासाठी भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत हे काम करण्यात येणार आहे. या काळात भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान ट्रस्ट चेअरमन व विश्वस्त मंडळाने केले आहे.

हेही वाचा :

The post Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिर आठ दिवस राहणार बंद appeared first on पुढारी.

Exit mobile version