
त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक विधीसाठी आलेल्या भाविकाच्या वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.
बुलडाणा जिल्ह्यातील डोणी येथील सोपान ज्ञानेश्वर लाटे हे काही भाविकांसमवेत इंडिगो कार (क्र. एमएच 28, व्ही 8486) या वाहनाने ञ्यंबकेश्वर येथे सोमवारच्या पूजेसाठी येत असताना जव्हार फाट्याजवळ बाजार समिती उपआवार परिसरात शहरात जाणाऱ्या रस्त्यावर वळण घेताच त्यांच्या कारने पेट घेतला. यावेळी लाटे यांनी समयसुचकता दाखवत वाहनातील प्रवाशांना खाली उतरवले व वाहन रस्त्याच्या बाजूला घेतले. त्यानंतर काही मिनिटांत ज्वालांनी वाहनाला लपटले.
घटनेची माहिती कळतच पोलिस हवालदार साळवी यांनी धाव घेतली. तसेच नगर परिषदेचे कर्मचारी नितीन शिंदे तातडीने अग्निशमन बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले. यावेळी कर्मचाऱ्यांनी परिसरातील युवकांच्या मदतीने गाडीची आग विझवली. मात्र, यात वाहन जवळपास खाक झाले आहे.
हेही वाचा :
- Stock Market Updates | जागतिक संकेत सकारात्मक! सेन्सेक्स पुन्हा ६२ हजारांवर, अदानींच्या ‘या’ शेअर्सची कमाल
- ‘तिने’ संग्रहालयात पाहिले स्वतःचेच काढलेले हृदय
The post Nashik : त्र्यंबकेश्वर रोडवर कारने अचानक घेतला पेट appeared first on पुढारी.