Nashik : दसक परिसरातील CNG पंपावर पाईपमधून गळती, कर्मचाऱ्यांचं प्रसंगावधान अनर्थ टळला

<p>नाशिकच्या दसक परिसरातील सीएनजी पंपावर मोठी दुर्घटना टळलीय. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास टाकीत भरल्या जाणाऱ्या पाईपमधून गळती झाली. पंपावरील ऑपरेटर आणि कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळलाय. या गळतीनंतर पंपावर सीएनजी विक्री थांबवण्यात आलीय. यानंतर पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.&nbsp;</p>